फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; दाम्पत्याचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोयाबिन आणि मका यांची परस्पर विक्री करून फसणूक करून पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने पत्नीसह पतीने मंगळवारी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी येथील रहिवाशी सुनिल पाटील हे पत्नी वंदना पाटील यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती व व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. जामनेरातील ईश्वरलाल किसनलाल कोठारी, अतुल सुरेश कोठारी, सुरेश किसनलाल कोठारी यांनी सुनिल पाटील याच्या मालकीचा सोयाबिन आणि मका या मालाची परस्पर विक्री करून फसवणूक केली होती. याबाबत सुनिल पाटील व त्यांची पत्नी वंदना पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली होती. परंतू पोलीसांनी अद्यापपर्यंत तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. पोलीसांकडून न्याय मिळत नाही म्हणून वंदना पाटील यांनी पती सुनील पाटील यांच्यासह मंगळवारी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा वंदना पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे.

Protected Content