भुसावळ प्रतिनिधी । येथील व्यापारीकडून काजुचा माल घेवून ७७ लाख ७४ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचा अटकपुर्व जामीन भुसावळ न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळातील रहिवाशी देवांग महेंद्र शाह हे व्यापारी असून त्यांना विश्वासात घेवून संशयित आरोपी दिपक सुरेश पेंडणेकर व दर्शना प्रकाश पवार यांनी १३ हजार ६६० किलो काजूचा माल घेवून सुमारे ७७ लाख ७४ हजार ४०८ रूपयांची फसवूणक केली होती. याप्रकरणी विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुरनं ७५/२०१९ भादवी कलम ४२०, ४०६ व १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील संशयित आरोपी दिपक सुरेश पेंडणेकर यांनी भुसावळातील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला तसेचे संशयित अरोपी दर्शना प्रकाश पवार यांनी अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांचे जामीन अर्ज भुसावळ न्यायालयाने फेटाळून लावले आहे. आरोपीतर्फे ॲड. कुलकर्णी यांनी तर सरकारतर्फे सरकारी वकील विजय खडसे यांनी काम पाहिले. फिर्यादीतर्फे ॲड. बी.डी.गामोट व ॲड. राजेद्र राय यांनी काम पाहिले.