प्रामाणिकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न : वर्मा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले आलोक वर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारवर प्रामाणिकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

या मुलाखतीत आलोक वर्मा म्हणाले की, भ्रष्टाचारांच्या मोठ्या प्रकरणांची चौकशी करणारी महत्वाची संस्था असल्यामुळे सीबीआयची स्वतंत्रता सुरक्षित आणि संरक्षित ठेवली पाहिजे. कोणत्याही बाहेरच्या दबावाशिवाय सीबीआयचे काम चालले पाहिजे. मी सीबीआयचा प्रामाणिकपणा कायम जपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रामाणिकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले. केवळ एका व्यक्तीने केलेल्या खोट्या, निराधार आरोपांमुळे मला पदावरून हटविण्यात आल्याचा आरोपदेखील त्यांनी या मुलाखतीत केला आहे.

Add Comment

Protected Content