जळगाव प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाचा १७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी रात्री पुण्यातून अटक केली आहे. संकेत सुरेश काकडे (वय-२५) रा. काकडपाट्टा ता. जुन्ना जि.पुणे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, नारायणी मधुकर गोसावी (वय-३७) रा. जळगाव ह्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी निवासस्थानी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा १८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविला होता. याप्रकरणी नारायणी गोसावी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देवून पळ काढत होता. दरम्यान संशयित आरोपी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ संजय भोई, नरसिंग पाडवी आणि सचिन पाटील यांनी जुन्नर जि. पुणे येथेून संशयित आरोपी संकेत सुरेश काकडे (वय-२५) रा. काकडपाट्टा ता. जुन्ना जि.पुणे याला अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय भोई करीत आहे.