वाळूने भरलेल्या ट्रक्टरची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

पारोळा प्रतिनिधी । कामावरून घरी दुचाकीस्वाराला वाळूने भरलेल्या ट्रक्टरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सावखेडा – करमाळा खुर्द रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रक्टरचालकाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, लखीचंद राजाराम चव्हाण (वय-६२) रा. करमाळा खूर्द ता. पारोळा जि.जळगाव हे त्यांचे मित्र धर्मराज नागराज पाटील रा. करमाळा खूर्द यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९, ८६८८) ने कामानिमित्त सावखेडा ता. पारोळा येथे गेले होते. रात्री ८ वाजता काम आटोपून पुन्हा दोघे मित्र दुचाकीने सावखेडाहून करमाळा खुर्द येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान रस्त्यावरील नाल्याजवळ समोरून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात लखीचंद चव्हाण आणि धर्मराज पाटील हे दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने पारोळा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्राथमोपचार घेवून पुढील उपचारासाठी धुळ्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लखीचंद चव्हाण यांच्या जबाबावरून धुळे शहर पोलीस ठाण्यात ट्रक्टरचालक रूपेश विलास पाटील रा. तामसवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!