यावल : प्रतिनिधी । हिंगोणा येथील जि प उर्दू शाळेत नव्यानेच रुजू झालेले प्रभारी केंद्रप्रमुख सैय्यद मुक्तार अली इबादत अली यांचा आज शालेय समितीकडून सत्कार करण्यात आला
कोरोना संसर्गाच्या संकटातुन आता दिलासा मिळत असुन शिक्षण विभागाने कोवीड १९च्या नियमावली अंतर्गत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला विद्यार्थी व पालकवर्गाकडुन अल्प प्रतिसाद तालुक्यात मिळत आहे . शाळा पुर्वपदावर याव्यात म्हणुन गटशिक्षणधिकारी नईम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे
हिंगोणा येथिल जिल्हा परिषद उर्दू शाळेत नव्याने रुजु झालेले फैजपूरचे प्रभारी केंद्रप्रमुख सैय्यद मुक्तार अली इबादत अली यांची नेमणुक करण्यात आली आहे पदभाराच्या पहिल्या दिवशी त्यांचा सत्कार शालेय समितीचे अध्यक्ष मुक्तार शेख व उपाध्यक्ष शब्बीर खान यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला
प्रभारी केंद्रप्रमुख सैय्यद मुक्तार अली यांनी सांगितले की माझी या पदावर शिक्षण विभागाने प्रभारी नियुक्ति केली आहे मि पूर्ण जबाबदारीने कर्तव्य पार पाडेल.
यावेळी मुख्याध्यापक अहमद खान, पदविधर शिक्षक सैय्यद युसुफ अली , फारूकी सल्लाउददीन सैय्यद अली मोहम्मद, आसीफ जनाब यांच्यासह मेहरबान तडवी , याकुब खान , फकीरा तडवी, अखलाख खाटीक , मुक्तार मन्यार उपस्थित होते.