प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अवमान झाला — मोदी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । २६ जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुखी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मन कि बात मध्ये म्हणाले. मोदी यांनी पहिल्यांदाच शेतकरी आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसेवर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावर भाष्य केलं. या महिन्यात क्रिकेट जगातूनही चांगली बातमी आली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकली. आपल्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले. आपल्याला येणारा काळ आशा आणि नाविन्याने ओतप्रोत भरायचा आहे. गेल्यावर्षी आपण संयम आणि साहस दाखवलेलं आहे. त्यामुळे या वर्षी मेहनत करून आपले सर्व संकल्प पूर्ण करायचे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी मोदींनी स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याने यंदापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होत असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी देशावासियांनी शहिदांप्रती लिहिलेल्या भावना वाचून दाखवल्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांबाबत संशोधन करून त्यांच्यावर लेख लिहिण्याचं आवाहन केलं. ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर दस्ताऐवज करण्यात येणार असून त्यासाठी लेख देण्याचं आवाहन त्यांनी केलं. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले. भारताची कोरोनाची लस संपूर्ण जागासाठी आशेचा किरण ठरली आहे. आपल्या देशातच जगातील सर्वाच मोठे लसीकरण सुरू आहे, असंही ते म्हणाले.

मोदींनी मध्यप्रदेशातील झांशीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यात येत असल्याचं सांगितलं. गुरलीन चावला यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून आधी आपल्या घरी आणि नंतर शेतात स्ट्रॉबेरीची शेती केल्याचं ते म्हणाले. हैदराबादमध्ये एका भाजी मंडईने भाज्या फेकून न देता त्यापासून वीज निर्माण करण्याचा संकल्प केल्याचंही त्यांनी सांगितलं

Protected Content