यावल येथे पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ

 

यावल प्रतिनिधी । जिल्हा परिषदच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील विविध गावातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन आज ३१ जानेवारी रोजी पल्स पोलीओ लसिकरण मोहीमस सुरूवात करण्यात आली आहे. प्रातिनिधिक स्वरुपात या पोलिओ लसीकरण मोहिमेचे यावल बसस्थानक येथे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते बालकास लस पाजून प्रारंभ करण्यात आला.

यावल तालुक्यातील किनगाव प्राथमिक केन्द्र, साकळी प्राथमिक केन्द्र, सावखेडा सिम प्राथमिक केन्द्र, भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्र, हिंगोणे प्राथमिक आरोग्य केन्द्र, पाडळसा प्राथमिक आरोग्य केन्द्र, न्हावी ग्रामीण रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातुन शहरात १४ ठिकाणी तसेच विविध ठिकाणच्या अंगणवाड्या, शाळा व शहरातील सार्वजनिक ठिकाणी आज आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलीओ निर्मूलन मोहीमेअंतर्गत डोस पाजण्याच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावल येथे बसस्थानकाच्या परिसरात या मोहीमेचे शुभारंभ नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील, जळगाव येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल शामलाल बन्सी, आरोग्य विभागाचे उमेश येवले , वाय. डी. चौधरी, यावल ग्रामीण रुग्णालयाचे औषधी विभागाप्रमुख सुर्यकांत पाटील यांच्यासह सामाजीक कार्यकर्त्यांच्या उपस्थित पल्स पोलीओ कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

Protected Content