पोलीस पाटलांनी नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक धनवडे

यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्गाचा तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढता प्रभाव लक्षात घेता यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी यावल तालुक्यातील पोलीस पाटलांची अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यात त्यांनी गावपातळीवर अधिक लक्ष देऊन नियमांचे पालन करण्याचे यावे असे आवाहन केले आहे.

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास यावल पोलीस स्टेशनच्या आवारात पोलिस प्रशासनाच्यावतीने शासनाने दिलेले संचारबंदी काळातील नियमांचे ग्रामीण भागातदेखील काटेकोर पालन व्हावे या दृष्टिकोनातून आज तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली होती. याबैठकीत या पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पोलीस पाटीलांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाचे कशाप्रकारे काटेकोर पालन करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात कार्य करीत असताना पोलीस पाटलांच्या अडीअडचणी व समस्यांची माहिती जाणून घेतल्या. पोलीस पाटलांची जबाबदारी ही अधिक वाढली असून कुठल्याही परिस्थिती ला न घाबरता आपण सक्षमपणे या कोरोना आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक खंबीर व सक्षमपणे तुमच्या मदतीला उभा आहे त्यामुळे आपण निस्वार्थ भावनेतून कार्य करावे ग्रामीण भागात सातत्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आपण सर्वांची जबाबदारी व काळजी वाढवणारी आहे गावातील होणारे लग्न समारंभ वाढदिवसाचे कार्यक्रम व इतर सार्वजनिक कार्यक्रम कशाप्रकारे नागरिक पार पाडीत आहे याच्याकडे आपली बारकाईने नजर असणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना सांगितले. या बैठकीस पोलीस पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, मनोज बारेला, अमोल कावडे, विठ्ठल कोळी, गजानन चौधरी, युवराज पाटील, उमेश प्रकाश पाटील, राकेश वासुदेव साठे, अशोक रघुनाथ पाटील, सलीम रमजान तडवी, मुकेश गणेश पाटील रेखा दिनकर सोनवणे, शारदा अनिल महाजन , पुनम सचिन, चौधरी , संजीव राजपूत, सचिन हिरामण तायडे, राजरत्न आढाळे, पंकज जीवन बडगुजर, मेहमूद फत्‍तु तडवी, सचिन हिरामण तायडे, मनोज यादवराव देशमुख,, यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

Protected Content