मुंबई (वृत्तसंस्था) एसपी विनय तिवारी यांच्याप्रमाणे पुन्हा असा वाद होऊ नये, म्हणून पोलिसांची परवानगी घ्यावी, असे सांगत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दात मुंबईत येण्याआधीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. एसपी विनय तिवारी यांच्याप्रमाणे पुन्हा असा वाद होऊ नये, म्हणून पोलिसांची परवानगी घ्यावी, असे सांगत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परवानगी घेतली नाही तर यापुढे इतर राज्यातून मुंबईत येणाऱ्यांना नियमानुसार क्वारंटाईन करावे लागेल. मुंबई महापालिकेने १४ दिवसांचा कालावधी क्वारंटाईनचा केला आहे. या नियमानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राहावे लागेल, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. सुशांतसिंह यांने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती.