जळगावातील भंगार व्यावसायिकाची १२ लाखांत फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेन न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण येथे राहणाऱ्या भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दोन जणांनी विश्वास संपादन करून तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल जब्बार कादर पटेल (वय-५७) रा. गुलाब बाबा कॉलनी, मेहरूण, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. अब्दुल पटेल व त्यांचा भागिदार तानाजी शिंगाडे यांनी मिळून भंगार खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय आहे. संतोष गुलाब खुडे आणि चंदू जाधव (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. कासेवाडी, भवानीपेठ, स्वारगेट, पुणे यांनी अब्दुल पटेल व तानाजी शिंगाडे यांच्याकडून ११ लाख ९० हजार रुपये  घेऊन भंगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी भंगार न देता त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात अब्दुल पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी संतोष गुलाब खुडे  व चंदू जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

 

 

Protected Content