कोरपावली ग्रामपंचायतीतर्फे गावात सॅनिटायझरची फवारणी

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण सॅनिटायझरची फवारणी करण्यात आले.

संपुर्ण जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत असुन, या महामारीचा प्रादुर्भाव सर्वाधिक ग्रामीण परिसरात सातत्याने वाढतांना दिसत असुन याच पार्श्वभुमीवर ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात आज दि ६ रोजी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण सॅनिटायजर फवारणी करण्यात आली.  या फवारणी कार्यक्रमाची तात्काळ अमलबजावणी करून सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांनी स्वताःच फवारणी यंत्रणेबरोबर राहुन कामाची पाहणी केली. याप्रसंगी कोरपावली ग्राम पंचायतचे सदस्य सत्तार तडवी , आरीफ तडवी , अफरोज पटेल, सिकंदर तडवी, ग्रामीण कॉग्रेससेवा फाउंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल, काँग्रेस कमेटीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश जावळे, युवा सामाजीक कार्यकर्त मुक्तार पिरण पटेल, जेष्ठ मार्गदर्शक पिरण पटेल, ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

 

दरम्यान आपल्या गावातील नागरीकांनी शासनाच्या कोवीड १९ नियमांचे काटेकोर पालन करीत आपआपल्या घरात रहावे, सुरक्षीत रहावे असे कडकडीत आवाहन सरपंच विलास अडकमोल यांनी केले आहे.

Protected Content