आठवडे बाजाराला मध्यरात्री भीषण आग

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आठवडे बाजाराला काल मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली भीषण आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

खामगाव येथील आठवडी बाजार असलेल्या दुकानांना रात्री बारा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले. मात्र रात्रीची वेळ असल्याने दुकानातील सामानांचेच मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाले नाही. आग विझवण्यासाठी अकोला शेगाव खामगाव येथील अग्निशामक दलाने तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर या आटोक्यात आणली. ही आग एवढी भयंकर होती की संपूर्ण परिसर आगी चया रौद्ररूपामुळे सर्वत्र धूर झाला होता .मध्यवस्तीत व परिसरात रहिवाशी वस्ती असल्याने नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन रात्र काढली.एकंदरीत अग्निशामन दलाच्या अथक परिश्रमाने आग नियंत्रणात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

ही आग कशामुळे व का लागली याबाबत कळू शकले नाही. अत्यंत दाट वस्तीत असलेले हे शहरातील जुना दुकानांचा व्यवसायिकांचा भाग असल्याने या आगीत मोठे नुकसान झाल्याचे कळते. या आगीत सुमारे नऊ दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. यात भाजीपाला, पान टपरी, नाश्ता सेंटर ,इलेक्ट्रॉनिक दुकान , किराणा या दुकानांचा समावेश आहे.

Protected Content