जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत या कारणावरुन जळगाव शहरातील ऑटोनगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ३ जणांविरोधात गुरुवार, १२ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जळगाव शहरातील ऑटोनगरातील रहिवासी प्रियंका मंगेश माळुकर वय २२ यांचा बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तपोवन गावातील मंगेश एकनाथ माळूकर यांच्याशी विवाह झाला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत अशी मागणी पती मंगेश याने प्रियंका हिस केली. या मागणीसाठी २८ मार्च २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ या दरम्यान पतीने वेळावेळी प्रियंका हिस मारहाण केली तर सासू व जेठ यांनीही प्रियंका हिला शिवीगाळ व दमदाटी करत तिचा छळ केला. हा छळ असह्य झाल्याने प्रियंका ह्या माहेरी जळगावात निघून आल्या. याप्रकरणी प्रियंका यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिचे पती मंगेश माळूकर, सासू उषा माळुकर, जेठ योगेश माळूकर या तीन जणंविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.