चाकूचा धाक दाखवत दोन मोबाईलसह रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळ भागात असलेल्या सोमानी गल्लीत चाकूचा धाक दाखवत दुकानदाराकडून दोन मोबाईल आणि आठशे रुपये रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संदीप शरद सोमानी (वय-४१) रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा, जळगाव हे शुक्रवार १० डिसेंबर रोजी रात्री ९वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर असताना ३ जण अचानक आले. त्यांच्यातील अक्षय बन्सीलाल धोबी उर्फ बाबू, जय सुतार, गोलू पूर्ण (नाव माहित नाही) अशांनी येऊन चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली व तुझ्याकडे काय आहे ते लवकर गल्ल्यातून काढ असे बोलून गल्ल्यातून ८०० रुपये काढले व फिर्यादीच्या हातातून दोन मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संदीप सोमानी यांच्या फिर्यादीवरून ३ जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पीएसआय गोपाल देशमुख करीत आहे.

Protected Content