धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जामोरा गावाजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कुठलेही सुरक्षा दर्शक सूचना नसल्यामुळे एकाच ठिकाणी एकाच आठवडयात दुसरा अपघात झाला आहे. या संबंधी दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, नरेंद्र राजू बेंढवाल (वय ३२, रा. डीडी नगर पारोळा) हे दि.२३ डिसेंबर रोजी रात्री आपली दुचाकी (क्र. एमएच. १२ डीझेड. ६६९६) ने धरणगावहून पारोळा जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने तेथे पाण्याचे टँकर उभे होते. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास रस्त्याचे काम सुरु असल्याबाबत सूचना नसल्यामुळे नरेंद्र बँडवाल यांना रस्त्यावर उभे असलेले टैंकर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकीने सरळ टॅकरला धडक दिली. या अपघात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश पचेरवार (रा. रामदेवसजीबाबा नगर, धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दीपक पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, मागील आठवडयात दि. १७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ चरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने शाम पाटील याच्या ताब्यातील मोटर सायकलचा वेग नियंत्रित न झाल्याने मोटार सायकल स्लिप होत जयवंत पाटील हा तरुण मयत झाला होता.