यंत्रणांना मी बांधील, सोमय्यांना नाही – मंत्री अनिल परब

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. यावर ज्याही यंत्रणाकडून मला प्रश्नांची विचारणा होईल, त्यांना उत्तरे द्यायला मी बांधिल असून किरीट सोमय्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नसल्याचे महाविकास आघाडीचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

मंत्री अनिल परब यांनी पुण्यात पहिल्या वातानुकूलित एसटीचे लोकार्पणनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले कि, माझा व्यवहार अतिशय पारदर्शक असून विभास साठेची जमिन खरेदी केली. विकली. त्यानंतर ज्यांनी रिसॉर्ट बांधले आहे, त्यांनी त्याची जबाबदारी पण घेतलेली आहे. यासंदर्भात सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना देण्यात आले असून ईडीची चौकशी झालेली आहे.

किरीट सोमय्यां म्हणजे कोणतीही तपास यंत्रणा नसून हा केवळ बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. यंत्रणा चौकशी करतील आणि त्यातून सत्य बाहेर येईलच, असेहि ते म्हणाले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.