खडसे महाविद्यालयात साने गुरुजींची जयंती व राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात 

 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या द्वारे साने गुरुजींची जयंती व राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. पी.पी.चौधरी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रा. चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांचे हक्क आणि अधिकार यासंदर्भात चर्चात्मक विवेचन केले. तसेच ‘जागो ग्राहक जागो’ ही संकल्पना ग्रामीण भागात राबवणे अत्यावश्यक आहे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य पाटील यांनी साने गुरुजींचे बालपण, शिक्षण आणि त्यांचे आत्मकथन श्यामची आई यासंदर्भात उद्बोधन केले. त्याचबरोबर साने गुरुजींचे आत्मकथन ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे असे आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत महाजन, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजीव साळवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताहीरा मीर मॅडम. प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. चव्हाण, प्रा.कोळी, प्रा. शेख, प्रा. डॉ. थोरात प्रा. गवळी, प्रा. डॉ.तोतावार, प्रा. शंकर पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके, विनायक राणे, महेश महाजन, राजू जुमले व मंगेश कोळी यांची विशेष उपस्थिती होती, तसेच प्रफुल एमनरे, स्वप्निल खिरोडकर, पवन खिरोडकर, अक्षय कांडेलकर, ललित लांडे व अभिषेक धांडे इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास विशेष सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजन खेडकर यांनी, प्रास्ताविक प्रा.विजय डांगे तर आभार प्रदर्शन शितल भोई हिने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Protected Content