भरधाव वाळू ट्रॅक्टरची दुचाकींना धडक; पाच जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कारवाईच्या भितीपोटी वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असतांना समोरु चालणार्‍या सात ते आठ वाहनांना उडविल्याची घटना मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता खोटेनगर स्टॉपजवळ घडली. या अपघातात ५ दुचाकीस्वार जखमी झाले असून जखमीतील ३ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जळगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा मोठा उपसा करून शहरात ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक केली जात आहे. मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर जळगाव शहराकडे येत होते. याचवेळी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथकाने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करत होते. दरम्यान, ट्रॅक्टरचा पाठलाग करत असल्याचे चालकाच्या लक्षात असल्याने कारवाईच्या भितीपोटी ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहन पळवित होता. याचवेळी वाटिकाश्रमजवळ चालकाने समोर चालत असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. तर एक कार वाहनावर जावून धडकली. अपघात घडल्यानंतर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसोडून पसार झाला. या अपघातात जावेद शेख अजीज (वय-२८), रा. पाळधी, ज्ञानेश्वर ठोसरे (वय-२३) रा. खोटेनगर, रामकृष्ण मराठे (वय-५०), रा. खोटेनगर हे तिघ जखमी झाले. जळगाव तालका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना केले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहेत.

Protected Content