पुरेसा लस पुरवठा होत नसल्याची राजस्थानचीही मोदींकडे तक्रार

 

 

जयपूर : वृत्तसंस्था । महाराष्ट्र सरकार पाठोपाठ आता राजस्थानने देखील कोरोना लसींच्या तुटवड्याचा मुद्दा मांडला आहे.  तत्काळ लसींचा पुरवठा करण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

 

देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्येत मोठी भर पडत आहे.  दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र आता या लसीकरण मोहीमेत काहीसा अडथळा निर्माण होत असल्याचं समोर येत आहे. कारण, महाराष्ट्रात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आले आहे.  केंद्र सरकारकडे देखील महाराष्ट्र सरकारकडून लसींचा पुरवठा वाढण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे.

 

या संदर्भात पंतप्रधान मोदींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्र लिहून, राज्यात दोन दिवसांत लसींचा साठा संपेल, तरी आणखी ३० लाख डोस पाठवले जावेत. अशी मागणी केली आहे.

 

काही दिवसांपासून  लसीच्या डोसचा तुटवडा हा चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लसीचे पुरेसे डोस केंद्राकडून येत नसल्याची तक्रार देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात नेमकं किती लसीकरण झालंय? डोस खरंच कमी पडले आहेत का? याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांना आता खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं

Protected Content