गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा 

congress goa 300x200

पणजी (वृत्तसेवा) मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून आज दुपारी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेत आमच्याकडे १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपा सरकार देखील अडचणीत आले आहे. पर्रिकर आणि डिसोझा या दोन भाजपा आमदारांचे निधन तसेच दोघांचा राजीनामा यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. त्यात काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत. सोमवारी दुपारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राज भवनात भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.
काँग्रेस नेते चंद्रकांत कावळेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून आमच्याकडे १४ आमदार आहे. त्यामुळे आम्हाला सत्तास्थापनेसाठी संधी दिली पाहिजे, अशी विनंती राज्यपालांना केल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपाच्या गोटातही सत्ता टिकवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत झालेले नाही.

Add Comment

Protected Content