डोंगर कठोरा येथील कॉंक्रीटीकरणप्रकरणी दोषींवर १५ दिवसांत कारवाईचा अहवाल ( व्हिडीओ )

 

2d9f6a34 c16b 427b 939f 46365bd7bc88

 

यावल (प्रतिनिधी) तालूक्यातील डोंगर कठोरा येथे दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये कॉंक्रीटीकरणासाठी पाच लाख रूपयांचा निधी समाज कल्याण विभाग जळगाव यांनी दिला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने हा निधी इतरत्र खर्च केला असल्याने याप्रकरणी फेर चौकशी करण्यासाठी भुसावळ येथील गटविकास अधिकारी भाटकर, भुसावळ शाखा अभियंता डोळे आज (दि.१५) चौकशी करण्यासाठी डोंगर कठोरा येथे आले असून कामाच्या पाहणीनंतर त्यांनी सांगितले की, चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाऊन, दोषींवर १५ दिवसात कारवाई केली जाईल.

या कामांची चौकशी करण्यासाठी दिनांक २ जुलै १८ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते आनंद मेघे यांनी त्या बाबत तक्रार दाखल केली होती. तेव्हा त्या कामांची चौकशी येथील विस्तार अधिकारी (ग्राम पंचायत विभाग) किशोर सपकाळे यांनी चौकशी केली असता चौकशी अंती सन २०११च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या नागरिकांची (नवबौध्दांची) लोकसंख्या ६४४ असुन डोंगर कठोरा येथे एकच दलित वस्ती आहे आणि काम ठिकाणी झालेलं आहे, असा अभिप्राय समाज कल्याण अधिकारी जळगाव यांना दिनांक १ नोव्हेंबर १८ रोजी सादर करण्यात आला होता. त्या अभिप्रायाचे अवलोकन त्यांनी केले असता त्यांना काम दलित वस्तीमध्ये झालेले दिसले नाही म्हणून गटविकास अधिकारी यांना त्यांनी कारणेदाखवा नोटीस बजावली होती व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि कार्यवाही केल्याचा अहवाल तत्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावा, असे आदेश बजावले होते. तरी प्रभारी गटविकास अधिकारी, चौकशी अधिकारी व विस्तार अधिकारी या तीन पदांवर एकच अधिकारी असल्याने चौकशी व कार्यवाही करण्यात दिरंगाई होत होती.

 

पहा संबंधित व्हिडीओ….

 

 

Add Comment

Protected Content