पुणे वृत्तसंस्था । राज्य सरकारने लॉकडाऊन ५ च्या नियमावलीत काही प्रमाणावर सूट दिली आहे. राज्यात आजपासून मिशन बिगीन अगेन सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. पुणे शहरातील १९९ पैकी १५० उद्याने उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहेत. या उद्याने किंवा मैदानात मंगळवारपासून मॉर्निंग वॉक करता येणार आहे.
मात्र कोरोनाबाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या उद्यानात प्रवेश करता येणार आहे. पुणे शहरातील मैदाने किंवा उद्याने सुरु होणार असली तरी मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.