धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल असोसिएशन धरणगाव तर्फे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यात युवासेना जिल्हा संघटक विनोद सुरेश रोकडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. यावेळी दुपार पर्यत 59 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मेडिकल असोसिएशन तर्फे विनोद रोकडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अध्यक्ष सुधाकर वाणी, सचिव छोटू जाधव, अँड. वसंतराव भोलाने, नगरसेवक नंदू पाटील रवी जाधव, रोहित चौधरी, भाऊसाहेब पाटील यांच्यासह डॉक्टर व मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. या रक्तदान शिबीराचा आयोजनाने सामाजिक दायित्वाची जाणीव जागृती केली आहे. स्थनिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला.