यावल तालुक्यात त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदराजंली

यावल, प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात विविध ठीकाणी आज त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी तसेच विविध ठीकाणी ग्रामपातळी सर्वसमाज बांधवांच्या बैठका घेवुन कायद्या सुव्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शन केले.

त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जंयतीचे औचित्य साधुन यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी तालुक्यातील साकळी, बोराळे, यावल या ठीकाणी विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या समाज बांधवांना कायद्यासंदर्भात आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बैठकीत त्यांनी सर्वप्रथम त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून आदरांजली वाहीली. त्याचप्रमाणे यावल शहरात त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली.

Protected Content