पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ज्ञानेश्वर तांबे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विकास सोसायटी कार्यालयात व्हाईस चेअरमन अर्जुन पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, अखिल  तडवी, उज्वला पाटील, कांता पाटील कांचन परदेशी, श्रीराम धनगर, तकदीर तडवी, बालू धनगर, प्रदीप धनगर, वत्सला धनगर, रेखा धनगर, सुनंदा धनगर, वंदना धनगर, कोकीळा धनगर, दीपक कंखरे, सोपान धनगर, ज्ञानेश्वर धनगर, राजाराम कंखरे, सचिन धनगर, विकास सोसायटी संचालक दत्तात्रय पाटील, प्रेमसिंग परदेशी, बालू कंखरे, शांताराम पाटील, दिलीप तांबे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content