Home राज्य पुढील चार दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस : हवामान विभाग

पुढील चार दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस : हवामान विभाग

0
40



पुणे (वृत्तसंस्था)
पुढील चार दिवस म्हणजे 11 ते 14 जून या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासात गोवा, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोवा, कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज आहे.


Protected Content

Play sound