यावल प्रतिनिधी । तालुक्यातील जामन्या शिवारात पिता-पुत्रावर रानडुकराने केलेल्या हल्ल्यात १६ वर्षाचा मुलगा ठार झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, आज सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान जामुन जंजिरा येथील साब सिंग रेंजर बारेला वय ४५ त्याचा पुत्र राजू सिंग बारेला वय सोळा हे मध्यप्रदेशातून गोट्या गावावरून यावल तालुक्यातील आंबा पाणी पासून एक किलोमीटर अंतरावर पायी येत असताना त्यांचेवर रानटी अचानक हल्ला केला. यात राजु बारेला (वय १६) हा जागीच ठार झाला. तर त्याचा पिता साब सिंग बारेला याने झुंज देत त्यास ठार केले. मात्र तो या झुंजीत गंभीर जखमी झाला आहे. घटनेचे वृत्त ग्रामस्थांना पर्यंत पडतात ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तत्काळ जखमी साप सिंग व मयत राजू यास यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सापसिंग वर उपचार करून त्यास जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.
यासाठी मोहराळा येथील पोलीस पाटील युवराज पाटील, लहू पाटील, गजानन पाटील, श्याम पाटील, दहिगाव चे उपसरपंच देविदास पाटील यांनी सहकार्य केले. तर वनक्षेत्रपाल विशाल कुठे, वनपाल असलम खान, बोराडे किरण गजरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व उपचारार्थ मदत केली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.