यावल प्रतिनिधी । तालुक्यासह जिल्ह्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी गेल्या चार महिन्यांपासून पगार थकीत असल्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीचे निवेदन आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांना देण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यासह संपुर्ण जळगाव जिल्ह्यात विविध ग्रामीण रुग्णालय आणि उपप्राथमिक केंद्र असुन या सर्व रुग्णालयांवर 40 वैद्यकीय अधिकारी हे अहोरात्र परिश्रम घेवुन रुग्णसेवेसाठी सतत कार्य तत्पर असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना शासनाकडुन मिळणारे मासिक पगार हे माहे फेबुवारी ते मार्चपर्यंतचे पगार झाले नसल्याने डॉक्टरांना कौटुंबिक व इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच या लेखी निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी ते मार्च आणि जुन संपला, जुलैचा महिना संपण्यात आला असून अद्यापही वैद्यकीय अधिका-यांचे मासिक पगार झालेले नाही आहेत. आम्हाला पगार कधी मिळणार आहे? असा प्रश्न वैद्यकीय अधिका-यांकडून उपस्थितीत होत आहे., तसेच राज्य शासने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु केला असुन, तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांच्या आर्थिक नोंदी करून वेतनाचा फरक अदा करावा, त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांचा शिकाऊ कार्यकाळ मंजुर करून त्यांना वाढीव भत्ता सुरू करावा व पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नावे पाठवण्यात यावीत, अशा विविध मागण्याचे निवेदन स्थायी वैद्यकीय अधिकारी (श्रेणी अ) यांनी तत्कालीन जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. समाधान वाघ यांना देण्यात आली आहे. त्याआदी या वैद्यकीय अधिकारींच्या शिष्ठमंडळाने जिल्हा परिषदचे सीईओ बि.एन.पाटील यांची भेट घेवुन आपल्या विविध अडचणी व समस्या मांडल्यात या शिष्टमंडळात डॉ. फिरोज एम तडवी, डॉ. विनायक महाजन, डॉ. विशाल पाटील, डॉ.मनिषा महाजन, डॉ. संदीप पाटील, डॉ. विक्रम गोखले, डॉ.गिरीष गोसावी यांचा आदींचा समावेश होता.