कोळन्हावी येथील ग्रामस्थांना दुषीत पाण्याची बाधा; ४१ जण रूग्णालयात

admit patient

जळगाव प्रतिनिधी । कोळन्हावी (ता. यावल) येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने सोडलेल्या दुषीत पाण्याची बाधा झाली असून ४१ स्त्री-पुरूषांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेचा तपशील असा की, तालुक्यातील कोळन्हावी येथे आज पिण्याचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी पिल्याने यातून ग्रामस्थांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊन विषबाधा झाल्याने दुपारी दोन वाजेपासून एकेक ग्रामस्थ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत असल्याने खळबळ उडाली असून आतापर्यंत ४१ रुग्ण दाखल झाले आहेत. या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात कोळन्हावी येथील १३ क्रमांकाच्या वार्डातील प्रदीप बाळू सोळंके, वासुदेव बापू सोळंके, निशा प्रदीप सोळंके, शोभा रमेश सोळंके, कल्पना ज्ञानेशवर सोळंके, ललिता गोरख सोळंके, शारदा बापू सोळंके , सुषमा जंगलू सोळंके, दिलीप आत्माराम सोळंके, भरती दिलीप सोळंके, अनुसूया सोळंके, ललित प्रकाश सोळंके, प्रदीप सुकलाल सोळंके, भागवत ढेमा सोळंके ,गोरख राजू सोळंके ,सरूबाई सोळंके , लताबाई भगवान तायडे, सुषमा जंगलू सोळंके, दगूबाई अभिमान सपकाळे, निर्मलाबाई महारु सैंदाणे , धीरज विलास सपकाळे आदींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी अज्ञात समाजकंटकाने पाण्यात काहीतरी विषारी पदार्थ मिसळल्याची शक्यता वर्तविली जात आहे . सर्व रुग्ण आज दुपारी १०८ रुग्ण वाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. तर दुसरीकडे गट विकास अधिकाऱयांनी गावात भेट दिल्याचे समजते.

Add Comment

Protected Content