पिआरसी दौरा तोंडावर असतांना गटशिक्षण विभागात स्वच्छतेचा अभाव

रावेर प्रतिनिधी  | पंचायत राज समिती( पिआरसी) दौरा तोंडावर असतांना गटशिक्षण विभागाला गांभिर्याचा विसर पडला आहे.कार्यालयात साने गुरुजींचा फोटो शेवटची घटका मोजत असून गरीब मूलांचे पुस्तके अस्त-वेस्त पडलेली होती. या विभागाकडे जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी लक्ष देण्याची गरज आहे.तसेच पंचायत राज समितीने या विभागाला भेट देण्याची मागणी होत आहे.

 

 

पंचायत राज समितीचा दौरा तोंडावर आहे. जिल्हा परिषद जळगाव ते पंचायत समिती रावेर सर्व दूर स्वच्छता, रंगरंगोटी  तसेच विविध विकास कामांच्या योजनेची पडताळणी सुरु असतांना आमच्या स्थानिक रिपोर्टर यांनी गट शिक्षण विभागाचा फेर-फटका मारला असता गटशिक्षण विभागात साने गुरूजीचा फोटो शेवटची घटका मोजत होता. तर पहीली ते सातवीच्या विद्यार्थीची पुस्तके अस्त-वेस्त पडली होती. मुलांना स्वच्छतेचा संदेश देणारी शिक्षण व्यवस्था अस्वच्छतेची शेवटची घटका मोजत होता. विशेष म्हणजे या कार्यलयात रोज गटशिक्षण अधिकारी येऊन बसतात, परंतु, त्यांना या गोष्टीचे जराही गांभिर्य दिसत नाही. या कार्यालयाला पंचायत राज समितीने भेट देण्याची मागणी सुज्ञ नागरीकां मधुन व्यक्त होत आहे.

Protected Content