


मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून महत्वाच्या असणार्या राज्यसेवेची परीक्षा १४ मार्च रोजी होणार आहे.
कोरोनामुळे एमपीएससीच्या परिक्षा झाल्या नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले होते. दरम्यान, युपीएससीच्या परिक्षा मार्गी लागल्या तरीही महाराष्ट्र लोकसेवा आयोग तारखा जाहीर करत नसल्यामुळे टीका देखील करण्यात येत होती. या पार्श्वभूमिवर आज विविध परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
यात १४ मार्चला राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. तर २७ मार्चला अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, ११ एप्रिलला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा होणार असल्याचे आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.


