जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको परिसरातील बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह गॅस सिलेंडर व इतर सामान चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत दहा दिवसानंतर मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशा रतनलाल जैन (वय 60) रा. पिंप्राळा, हुडको जळगाव या महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ९ नोव्हेंबर सायंकाळी ५ ते १३ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद कर फोडून घरातील सोन्याचे दागिने गॅस सिलेंडर व स्टीलची शेगडी असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून याचे समोर आले. या संदर्भात तब्बल १० दिवसानंतर मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे..