तीन जणांनी तरुणाला लुटले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर उड्डाण रेल्वे पूल जवळ सोमवारी रात्री अकरा वाजता आज्ञा तीन जणांनी तरुणाला बिडी मागण्याच्या कारणावरून जबरी वाद घालून खिशातील 17 हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल असा एकूण 29 हजार 800 रुपये किमतीचे मुद्देमाल जबरी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन राजेंद्र अहिरे वय 37 रा. क्षत्रिय मंगल कार्यालयाच्या मागे शिवाजीनगर, जळगाव हा तरुण साफसफाईचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सचिन हा शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूला जवळून पायी जात असताना अज्ञात 3 जण त्यांच्यासमोर दुचाकीने येऊन त्याच्याशी बिडी मागण्याचा वाद घातला. त्यानंतर त्याच्या खिशातील 17 हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून हातातील दोन मोबाईल लांबविले. हा प्रकार घडल्यानंतर सचिन अहिरे याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता अज्ञात तीन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भंडारकर करीत आहे.

Protected Content