पिंप्राळा हुडको प्राणघातक हल्ल्यातील एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून पिंप्राळ हुडको येथील एकावर तीन ते चार जणांनी तलवार व कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणातील रामानंद नगर पोलीसांनी एकाला अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शुभम संजय पवार सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको यास मध्यरात्री अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय घडली होती घटना
उषाबाई दिलीप नगराळे वय 40 या बुध्द वसाहत पिंप्राळा हुडको येथे पती, दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचा लहान भाऊ सुनील पंडीत भालेराव रा. पिंप्राळा हुडको तसेच आई नर्मदा व बहिण अशा हे तिघेही राहतात.13 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सुनील पंडीत भालेराव यास मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी मिलिंद भिमराव आखाडे वय 30 रा. पिंप्राळा हुडको , पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, विरन खैरनार याच्यासह इतरांनी या परिसराती मंदिरासमोर कोयते व तलवारीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी उषाबाई नगराळे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी मिलिंद आखाडे, पंकज आडांगे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला या तिघांना अटक केली आहे.

या पथकाने केली अटक
पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, भूषण पाटील, संतोष गीते, शिवाजी धुमाळ यांच्या पथकाने राहत्या घरातून संशयित आरोपी शुभम पवार याला राहत्या घरातून अटक केली. आज सकाळी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content