हिंगोण्याजवळच्या अपघातातील मृतांची संख्या दहावर

acdentt

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या हिंगोणा येथे मध्यरात्री झालेल्या अपघातातील मृतांची संख्या दहावर गेली असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

याबाबत वृत्त असे की, रविवारी रात्री अकराच्या सुमारास चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथील चौधरी कुटुंबीय क्रुझर (क्र.एमएच.१९- सीव्ही. १७७२) चारचाकीने मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान, हिंगोणा गावाजवळ समोरून येणार्ु२००व;या डंपरने (क्र.एमएच. १९-७७५८) त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली.

मयतांची नावे
मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय-65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय-60), अश्लेषा उमेश चौधरी (वय-28), रिया जितेंद्र चौधरी (वय-21), प्रभाबाई प्रभाकर उर्फ बाळू चौधरी (वय-40), सोनाली जितेंद्र चौधरी (वय-34), प्रियंका नितीन चौधरी (वय-28) सर्व रा. चिंचोल ता.रावेर, सोनाली सचिन महाजन (वय-34)रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर, सुमनबाई श्रीराम पाटील वय-55 आणि संगिता मुकेश पाटील वय-40 दोन्ही रा. निंबोल ता.रावेर यांचा मृत्यू झाला आहे.

जखमींचे नावे
सुनिता राजाराम पाटील (वय-45), मिना प्रफुल्ल चौधरी (वय-30), शिवम प्रभाकर चौधरी (वय-15), सर्वेश नितीन चौधरी (वय-9), चालक धनराज गंभीर कोळी सर्व रा. चिंचोल ता. ता. मुक्ताईनगर, आदिती मुकेश पाटील (वय-14) रा. निंबोल ता. मुक्ताईनगर आणि चालक मुकुंदा गणेश भंगाळे (वय-25) रा. डांभूर्णी ता. यावल सर्व जखमींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Protected Content