अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील कै.सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. साक्षी रवींद्र पाटील व साक्षी ज्ञानेश्वर पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव असून दोन्ही विद्यार्थिनींची ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सदर विद्यार्थिनींना मुख्याध्यापक एस. डी. सूर्यवंशी शिक्षक जे. एस. पाटील, यू. बी. पाटील , डी. जी. पवार, वाय. एम. जाधव, डी. बी. पाटील व रुपाली निकम या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब व्ही. एन. पाटील व उपाध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील तसेच पिंपळे व अाटाळे गावाचे सरपंच यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.