चित्रकला महाविद्यालयाच्या कलाशिक्षक अभ्यासक्रम द्वितीय वर्गाचा निकाल जाहीर

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष कलाशिक्षक अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे.

महाविद्यालयातून व्दितीय वर्गात १६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातून प्रथम क्रमांक अहिरे सिध्दी भरत (परधाडे), व्दितीय क्रमांक निगारीश अंजुम शेख (पाचोरा), तृतीय क्रमांक सोनार मनीषा नरहर (पाचोरा) यांना प्राप्त झाला असून सर्व विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, नरेश मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील, प्रा. निलेश शिंपी, देसले फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष देसले यासह कलाशिक्षक व पालकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content