पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत तसेच आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, या मागणीसाठी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात शेकडो महिला- पुरुष रस्त्यावर उतरले होते.
चिंचवड स्टेशन परिसरातील आनंद नगर झोपडपट्टीत 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर महापालिकेने सील केला आहे. त्यामुळे आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नधान्य, जेवण मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरल्या होत्या. सगळेच बंद असल्याने झोपडपट्टीतील महिलांना अन्नधान्य मिळेना, उपाशी रहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. आनंद नगरमधील सगळी किराणा, रेशनची दुकान चालू राहतील. सर्वांची जेवणाची व्यवस्था केली जाईल. महापालिकेकडून घरपोच जेवन दिले जाणार आहे, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यानंतर गर्दी कमी झाली होती. या घटनेमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.