यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिकाचे तंत्र आणि उत्पादन विक्रीच्या मंत्राने वाटचाल केली तर शेतकऱ्यांची नक्की उन्नती होईल. राजकारण डोक्यातून काढणार नाही तोवर शेतकरी प्रगती साधता येणार नाही. संघटित होणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे संघटन मंत्री दादा लाड यांनी येथे केले. ते भारतीय किसान संघ आयोजित कापूस परिषदेत येथे बोलत होते.
दादा लाड .पुढे ते म्हणाले की, शक्तीने एकत्र या. काळ्या आईची कास धरा. शेतकऱ्यांना भाव व वीज मिळाली पाहिजे. कृषी संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी ताकद निर्माण केली नाही म्हणून शेतकरी मागे पडले आहेत. केवळ आंदोलन म्हणून भारतीय किसान संघ काम करीत नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान देवून प्रगत कसे करता येईल यासाठी देखील झटत असतो. कापसाचे यंदा भाव वाढले आहेत. ते कायमच राहतील असे नाही. पण उत्पादन वाढीचे तंत्र अंगिकारले तर फायदा निश्चित हॊईल. गळ फांदी कट करा आणि कापसाची उंची रोखा.आपण शेतकरी वर्षभर कापूस घेण्याचा चुकीचा विचार सोडला पाहिजे.त्याला पाहुण्यासारखा ठेवून डिसेंबरमध्ये दुसरे पिक घेण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला.
तीन बाय एकच करा तथापि माझी शिफारस दोन बाय एक वर लावण्याची असेल.डिसेंबर नंतर दुसरे पीक घ्या. कापूस लागवड बेड आणि मल्चिंग पेपर वापरून निंदणी वाचून हमखास उत्पादन वाढते. तर मल्चिंग पेपर कापूस झाडाचे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे पांढऱ्या मुळा फुटतात परिणामी कापूस उत्पादन वाढते. बी. टी. कॅाटनचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल. दुसरे पिक घेवून शेतकरी मुबलक कमाई करु शकेल. दादा लाडांची कापूस लागवड. व संगोपन पध्दत आय.सी.आर.ने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांना कापूसाबाबत काहीही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन लाड यांनी शेतकऱ्यांना केले.
या कापूस परिषदेचा प्रारंभ भारतमाता व भगवान बलराम यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आला. मार्गदर्शक प्रांत संघटन मंत्री दादा लाड यांचे स्वागत अशोक गडे यांनी केले. प्रास्तविक रावेर शाखेचे मंत्री सुशील पाटील यांनी केले.आभार जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे यांनीमानले. यावेळी किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, सहमंत्री राहुल बारी, जिल्हा युवा प्रमुख सुमित पाटील उपस्थित होते. तर कापूस परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गडे, घनःश्याम चौधरी, घनःश्याम शिंदे, तेजस गडे आदिंनी परिश्रम घेतले.यावेळी शेकडो कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
उद्या दि.२१ ला वाघळी येथे कापूस परिषद
त्याचप्रमाणे दि.२१ रोजी वाघळी ता.चाळीसगाव येथे विजय रसवंती गृह, चाळीसगाव भडगाव रस्त्यावर ही कापूस परिषद सकाळी ९ वाजता होणार आहे.