पाळधीसाठी २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करणार — पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

 

 

 

पाळधी , (धरणगाव) : प्रतिनिधी ।  पाळधीसाठी गिरणा नदीवरून २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करणार असून  विद्यापीठाच्या जागेत शासनाच्या परवानगीने पाण्याची टाकी बांधणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी बु. येथे २ कोटी ३८ लक्षच्या पुलाचे व रस्त्याच्या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

 

चांगले रस्ते व पूल  दळण – वळणासाठी उपयुक्त आहेत.जनतेला दिलेल्या वचनांची  पूर्ती करताना राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले आहे , असेही ते म्हणाले . या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.

 

यावेळी ना.गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पाळधी येथे १ कोटी ४३ लक्ष निधीतून रेस्ट हाऊससाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून नाबार्डमधून पाळधी गावाजवळील चांदसर रस्त्यावर  व  पाथराड रस्त्यावर लहान पुलासाठी १ कोटी निधी मंजूर आहे.लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. गावाचा विस्तार झपाट्याने होत असून वाढीव वस्तीत पुढील काळात रस्त्यांचे खडीकरण करणार असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गावात बौद्धविहार व्हावे अशी मागणी करताच ना. पाटील यांनी १६ लक्ष निधी आमदार निधीतून देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे बौद्धविहाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पाळधी , पथराड , झुरखेडा , दहिदुल्ला रस्ता प्रजिमा ५७ किमी 0 /00 ते 0/७00 मशिदी पासून ते बस स्टॅन्ड पर्यंत अशी एकूण ७७० मीटर लांबी चे काम ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे, रस्त्याची सुधारणा करणे व पाळधी गावात लहान पुलाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कामास ३ कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. कोविडच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील कामे सुरू करता येऊ शकली नव्हती. या  रस्त्याच्या व पुलाच्या कामामुळे पाळधी मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

 

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे,  जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,  विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील ,  उपसभापती शारदा पाटील, चांदसरचे  सरपंच सचिन पवार, आसाराम कोळी, अनिल पाटील, ,पाळधी बु.च्या  सरपंच अलकाबाई पाटील, पाळधी खु. सरपंच सुनंदा माळी, शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, दिलीप पाटील  , माजी सरपंच अलिम देशमुख ,  सा. बा. विभागाचे उपअभियंता मुकेश ठाकूर , शाखा अभियंता व्ही. टी. महाजन , बी.एस. माळी , गोकुळ पाटील, बबलू पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या  पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व   प्रास्ताविकात पं. स. सभापती मुकुंद  नन्नवरे यांनी रस्ते व पुलाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार  युवासेनेचे आबा माळी यांनी मानले.

Protected Content