जिल्हा पत्रकार भवनात वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसी कार्यकर्ता संवाद मेळावा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पत्रकार भवनात आज वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसी कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा आणि जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. 

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड.धनराज वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,  भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना धनराज वंजारी यांनी सांगितले की, मागील काळात केलेली नोटबंदी आणि आताचा कोरोना हे मनुवादी अन् जातीयवादीशक्तींनी आखलेले षडयंत्र आहे, या तुन तमाम बहुजन समाजाला आर्थिक दृष्ट्या पंगू, कमकुवत करण्याचा कुटील डाव आहे. एकदा कि तुम्ही त्यात अडकले की रोजी रोटीच्या शोधातच तुम्ही गुरफटून जाल म्हणून हा डाव असफल झाला पाहिजे तुम्ही सावध रहावे नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे ठोस पणे सांगितले.

कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे , जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर , रफिक बेग, डिगंबर सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे मुबारक पठाण, प्रकाश सरदार, अरुण तायडे, गमिर शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुजाता ठाकुर , बाळा पवार, सुपडा निकम, बालाजी पठाडे,सचिन सुरवाडे, भिकाजी असलकर, बाळासाहेब पाटील, सुनिल ठाकुर, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा संगिता भामरे, देवदत्त मकासरे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, विद्यासागर खरात, सचिन वानखेडे, प्रमोद बावस्कर, गणेश महाले, सुमित सोनवणे, जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे, अण्णा मोरे, रुपेश साळुंके, बबन कांबळे, स्वप्नील सोनवणे, राजु इंगळे, विनोद लोखंडे, सुरेश सुरवाडे आदी उपस्थित होते.

 

Protected Content