चोपडा येथील दोन विद्यार्थींनींचे सी.ए. फाऊंडेशन परिक्षेत यश

चोपडा प्रतिनिधी । चोपड्यातील प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या दोन विद्यार्थिनींनी  सी.ए. फाऊंडेशनच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून साक्षी साखला, क्रांती पाटील या दोघे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय.

क्रांती पाटील या विद्यार्थिनीला सर्वाधिक 284 /400 गुण मिळाले असून तिने चोपड्यातुन सी. ए. फाऊंडेशन अकाउंट विषयात आणि math’s (मॅथसं ) विषयात सर्व प्रथम आली आहे. या यशाचे कौतुक व्हावे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी म्हणून क्लॉसेस कडून त्या विध्यार्थीनींचा सत्कार येथील गांधी चौकातील बालाजी मंदिरच्या हॉलमध्ये करण्यात आला. या वेळी विद्यार्थी मित्र मैत्रिणी, पालक, मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत असतांना सांगितले की, आमचे मित्र मैत्रिणी पुणे, मुंबई,नाशिक हून क्लासेस करूनही त्यांना आपल्या पेक्षा कमी गुण मिळत असतात चोपड्यातच राहूनच आम्ही हे यश संपादन केल्याने मनात सहर्ष आनंद होत आहे. छोट्या गावाच्या क्लॉसेस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष असते. त्याचंच फायदा आमच्या सारख्या विध्यार्थीना होत असतो आम्ही आज जे ही यश संपादन केले आहे त्यात क्लासेसच्या प्रत्येकवर लक्ष म्हणून आम्ही खूप खुश असल्याची भावना दोन्ही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

प्रामुख्याने शोभा सांखला, मनोहर पाटील, प्रवीण जैन मार्गदर्शक शिक्षक सीए तृप्ती अग्रवाल , प्रा.कु प्रिया शर्मा.(संचालिका )  फाउंडेशनचे उपस्थित होते.

Protected Content