कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महाविकास आघाडी अपयशी; भाजपाचे निवेदन

यावल प्रतिनिधी । कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यात महाविकास आघाडी सरकार सफसेल अपयशी ठरले असून शासनाने तातडीने पावले उचलून कोवीड-१९ला अटकाव करावा तसेच विविध मागण्यांसाठी भाजपातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संदर्भात केंद्रसरकारने नियम आखून दिले आहे. मात्र आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य महाविकास आघाडीचे सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे, दुसरीकडे सरकारकडे बोट दाखवायची आणि मुख्यमंत्र्यांचे आपली आमदारकीची निवडणूक बिनविरोध कशी होईल याकडे लक्ष होते. राज्याचे मुख्यंमत्री खरं तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जावून कोरोना संदर्भात आढावा घ्यायला हवा होता. मात्र ते घराबाहेर पडायला तयार नाही.

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत तर दुसरीकडे पोलिसांवर हल्ल्यांचे प्रमाण देखील वाढताय. केंद्र सरकाने मोठे आर्थिक पॅकेज जाहिर केले आहे. कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली, केरळ या सर्वांनीच आपपल्या राज्यातील जनतेकरीता काही हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. अद्याप मात्र महाराष्ट्रासाठी कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. लॉकडाऊनच्या काळात उशीराने रेशन धान्य वाटपाला सुरूवात करण्यात आली. शेतकऱ्यांना हमी भाव द्यायला वेळ नाही, अवकाळी पावसामुळे होणारे पीकांचे नुकसान भरपाई मिळालेली नाही. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही. आरोग्य विभागात पीपीई कीट उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील ठिकठिकाणची विलगीकरण केंद्राची स्थिती भयावह आहे. तेथे जेवण, पाणी व प्राथमिक सोयासुविधा पुर्णपणे उपलब्ध नाही. राज्याराज्यात व जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी व नागरिकांसाठी कुठल्याहीप्रकारची सोय राज्यसरकारने केली गेल्या तीन महिन्यात केली नाही. परिवहनमंत्र्यांनी दहा हजार एसटी माध्यमातून सर्व परप्रांतीयांना मोफत प्रवार करून देऊ अशी फसवी घोषणा केली. या सर्व गोष्टीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त केला असून कोवीड-१९ संदर्भात तातडीने पावले उचलून याला अटकाव करावा व जनतेला आर्थिक पॅकेज घोषित करावे, असे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या
हर्षल पाटील, पं.स.सदस्य दिपक पाटील, जि.प.सदस्य रविंद्र पाटील, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे, व्यंकटेश बारी, सरचिटणीस हेमंत चौधरी, परेश नाईक, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, भा.यु.मो शहराध्यक्ष रितेश बारी, दरबारसिंग पाटील, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, उदय बाऊस्कर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहे.

Protected Content