सर्व एक्झीट पोल्समध्ये महायुतीला कौल

Shivsena BJP

मुंबई प्रतिनिधी । मतदान झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सर्व एक्झीट पोल्समध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या, मीडिया हाऊसेस आणि रिसर्च संस्थांनी आपापले एक्झीट पोल जाहीर केले. यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यात एबीपी-सी व्होटरने केलेल्या संयुक्त सर्व्हेक्षणात राज्यात महायुतीला २०४; महाआघाडीला ६९ तर इतरांना १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊच्या एक्झीट पोलमध्ये महायुतीला २३०; महाआघाडीला ४८ तर इतरांना १० जागा मिळू शकतात. सीएनएन-न्यूज १८ व आयपीएसओएसच्या संयुक्त एक्झीट पोलमध्ये तर महायुतीला तब्बल २४३ जागा मिळण्याचे भाकीत करण्यात आले असून महाआघाडी ४१ व इतर ४ जागा निवडून येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. टिव्ही ९ मराठीनुसार महायुतीला १९७, महाआघाडीला ७५ तर इतर १५ जागा निवडून येतील असे सांगण्यात आले आहे. ‘इंडिया टुडे-माय अ‍ॅक्सीस’च्या संयुक्त सर्व्हेक्षणात महायुतीला १८१, महाआघाडीला ८१ तर इतरांना २६ जागा मिळू शकतात. ‘जन की बात’ संस्थेने महायुतीला २२३, महाआघाडीला ५४ तर इतरांना ११ जागा मिळण्याचे दर्शविले आहे.

Protected Content