धरणगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौथऱ्यांवर बुट घालून उभे राहून ध्वजारोहण केले. यासंदर्भात ठोस प्रहार वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द करुन हेतुपुरस्कर सोशल मिडियावर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकणी येथील नगराध्यक्ष नीलेश सुरेश चौधरी यांनी संपादिका जयश्री दाभाडे-सांळूके यांच्या विरुध्द धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आविनाश ढाकणे व जिल्ह्याचे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पायात बुट घालून ध्वजारोहण करुन अशिक्षितपणाचे दर्शन घडवून ध्वजचा अवमान केल्याची बातमी ‘ठोस प्रहार वर्तमान ‘ पत्रात छापून सोशल मिडियावर ही बातमी टाकून बदनामी केली. म्हणून संपादक जयश्री दाभाडे-सांळूंके यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पवन देसले हे करीत आहेत.