पंचशील नगरातून एका तरुणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।तालुक्यातील नशिराबाद गावातील पंचशील नगरातून एका तरुणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १० डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आले आहे. शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने अखेर गुरुवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल कैलास सोनवणे रा. पंचशील नगर, नशिराबाद ता. जळगाव हा तरुण परिवारासह वास्तव्याला असून खाजगी कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. १० डिसेंबर रोजी रात्री २ वाजता त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ डीई ३५५२) ही त्याच्या घरासमोर पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार पहाटे ४ वाजता उघडलेला आला. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल सोनवणे यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला. मात्र त्याला दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर गुरुवार १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलिसात दुचाकी चोरी झाल्याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युनूस शेख हे करीत आहे

Protected Content