पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते होणार इमारत लोकार्पण व नामकरण सोहळा

यावल,   प्रतिनिधी  ।  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावल आवारातील  नवीन क्लिनींग ग्रेडींग युनिट व गोडाऊन बांधकामाचे लोकापर्ण व प्रशासकीय धान्य चाळण व कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे नामकरण सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात येणार आहे. 

 

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून  राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे यांच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या भव्य क्लिनिंग ग्रेडींग युनिट व गोडावुन बांधकामाचे लोकापर्ण व नामकरण सोहळा शुक्रवार २५ जून रोजी  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून  राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आ. चंद्रकांत बळीराम सोनवणे, मुख्य अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे , माजी जलसंपदामंत्री व आमदार गिरीष महाजन , यावल रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , आमदार  लता सोनवणे , मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे यांची उपस्थिती राहणार आहे.  सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कोवीड१९च्या नियमांचे पालन करीत आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषारसिंग ( उर्फ मुन्नाभाऊ ) सांडुसिंग पाटील, उपसभापती उमेश प्रभाकर पाटील यांच्यासह कृउबाचे संचालक मंडळ तसेच सचिव स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.

 

Protected Content