जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आजपासून कोवीशिल्ड लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. आज पहिल्या टप्प्यात जिल्हा रूग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातील २९७ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अधिसेवीका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांनी अनुक्रमे पहिल्या सहामध्ये लस घेतली. त्यामुळे हि लस सुरक्षित असल्याचे सांगत कोणीही लसीबाबत घाबरू नये असा संदेशच आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी दिला.
आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी सर्वात पहिले लस घेण्याची राज्यातील बहुधा पहिलीच वेळ ठरली. जगभर कोरोना महामारीने ग्रासले आहे. या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. जिल्ह्यात एकूण २४ हजार ३२० लसी उपलब्ध झाल्या आहेत. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य सेवेचे नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु.बी. तासखेडकर, आरएमओ डॉ. विलास जयकर यांनी ऐकला.
संदेश ग्रहण झाल्यावर लसीकरणाच्या ठिकाणी मान्यवर रवाना झाले. रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत कक्ष क्र. ३०० येथे पालकमंत्री, आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी लसीकरण कक्षाची पाहणी केली. येथे सुरुवातीला आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी ‘कोविशील्ड’ लस घेतली. अधिपरिचारिका कुमुद जवंजार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना डाव्या हाताच्या दंडावर पहिली लस टोचून लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ केला.
त्यानंतर अनुक्रमे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अधिसेवीका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांनी लस घेतली.
कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच हे उदाहरण असावे.
लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण १०० आरोग्य कर्मचाऱ्याच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले होते. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, संपत मल्हार, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/3231255673642326