पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा सरपंच मेळावा व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सत्कार समारंभाचे दि. १२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच परिषद मुंबई  शाखा जळगाव जिल्ह्यातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

सरपंच परिषद मुंबई जळगाव जिल्ह्यातर्फे आदित्य लॉन्स येथे रविवार १२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा सरपंच मेळावा व  आदर्श गाव योजना कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजार सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे असणार आहेत. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, सरपंच परिषद प्रदेश सरचिटणीस अॅड.विकास जाधव यांची राहणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, आ. राजुमामा भोळे, जि.प.अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, आ. .चिमणराव पाटील, आ.चंदुभाई पटेल, आ. संजय सावकारे,आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. अनिल पाटील, आ. लताबाई सोनवणे, आ. मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील , माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे यांची उपस्थिती राहणर आहे. आजी व माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थितीत राहवे असे आवाहन सरपंच परिषद मुंबई जळगाव जिल्हा समन्वयक युवराज पाटील, बाळू धुमाळ, श्रीकांत पाटील, बाळू चव्हाण, राजमल भागवत, विलास घुले यांनी केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/650772716291300

 

Protected Content